dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खामगाव शेगाव मार्गावर भीषण अपघात; पाच जण ठार

अनुप गवळी/ खामगाव – आजची बुधवारची पहाट अपघाताची ठरली असून खामगाव शेगाव मार्गावरील जयपुर लांडे जवळ झालेल्या खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनाच्या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत तर 25 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

अनुप गवळी/ खामगाव – आजची बुधवारची पहाट अपघाताची ठरली असून खामगाव शेगाव मार्गावरील जयपुर लांडे जवळ झालेल्या खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनाच्या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत तर 25 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. 

 प्राथमिक माहितीनुसार, आज 2 एप्रिल रोजी  सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाडाकडे जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले मृत्यू झाला आहे. त्यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजार असून पुढील कारवाई केली जात आहे.

अशी आहेत अपघातातील मृतकांची नावे

शिवाजी समाधान मुंडे बोलेरो चालक रा.शेगाव, शिवदास, ज्ञानेश्वर मरावी, कृष्णकुमार सरोते, माहेरूनिसा शेख हबीब यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाले आहेत अद्यापही पोलिसांकडून बचाव कार्य सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top