देऊळगाव राजा येथे बंद वाहनात आढळला हेड कॉन्स्टेबलचा मृतदेह

देऊळगाव राजा :  सर्वसामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच खाकी वर्दीतील नायक असुरक्षित असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या रक्षणाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात अंढेरा पोलीस स्टेशनला कार्यरत हेड कॉन्स्टेबल भागवत गिरी यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर रविवारी आतून लॉक असलेल्या स्विप्ट गाडीत जालना पोलीस दलात कार्यरत पोलीसाचा मृतदेह आढळल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.. 

देऊळगाव राजा :  सर्वसामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच खाकी वर्दीतील नायक असुरक्षित असल्याचे अलिकडील काही घटनांवरून दिसून येत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या रक्षणाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात अंढेरा पोलीस स्टेशनला कार्यरत हेड कॉन्स्टेबल भागवत गिरी यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर रविवारी आतून लॉक असलेल्या स्विप्ट गाडीत जालना पोलीस दलात कार्यरत पोलीसाचा मृतदेह आढळल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.. ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के, वय ३८, रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगावराजा असे खून झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते जालना पोलीस दलात कार्यरत होते..

    देऊळगाव राजा- सिंदखेडराजा रस्त्यावरील गिरोली खुर्द गावाजवळ वन विभागाच्या जागेत रविवार ३० मार्चला एका स्विफ्ट गाडीमध्ये पोलिसाचा मृतदेह आढळला. संशयास्पदरित्या आढळलेल्या या मृतदेहामुळे खून की आत्महत्या? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मृतदेह गाडीतून बाहेर काढल्यानंतर हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे. अज्ञात आरोपींनी मागे बसून पोलिसाचा गळा आवळून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.  एम एच २० , डीव्ही ३०६३ क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीत पोलिसाचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवरच होता. रविवारी सकाळी देऊळगाव राजा सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जंगलात मुख्य रस्त्यापासून ७० ते ८० मीटर अंतरावर एक स्विफ्ट डिझायर गाडी उभी होती. त्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक, फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकातील राणी श्वान घटनास्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंत गेली आणि तिथून पुन्हा घटनास्थळापर्यंत परत आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.

गिरोली येथे नेहमी यायचे ज्ञानेश्वर म्हस्के

 स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक ज्ञानेश्वर म्हस्के अतिशय शांत स्वभावाचे होते. जालना येथील अंबड चौफुली जवळ ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. गावाकडे गिरोली खुर्द येथील घरी आई आणि त्यांची बहीण राहते. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. गावाकडे शेती व इतर कामासाठी ज्ञानेश्वर म्हस्के यांचे नेहमी येणे जाणे असायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »