Chhatrapati Sambhajinagar Crime News:समर्थनगर परिसरातील विवेकानंत महाविद्यालयाच्या बाजुला वर्दळीच्या ठीकाणी असलेल्या एसबीआयचे एटीएमचा पञा कापून चोरट्यांनी सुमारे ८ लाख ८९ हजार ३०० रुपये पळवले. १ डिसेंबर रोजी पहाटे ३.२३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
छत्रपती संभाजीनगर : समर्थनगर परिसरातील विवेकानंत महाविद्यालयाच्या बाजुला वर्दळीच्या ठीकाणी असलेल्या एसबीआयचे एटीएमचा पञा कापून चोरट्यांनी सुमारे ८ लाख ८९ हजार ३०० रुपये पळवले. १ डिसेंबर रोजी पहाटे ३.२३ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे चोरट्यांनी एटीएम बाहेरील आणि एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर डार्क स्प्रे मारुन ही चोरी केली.
प्रकरणात एसबीआय क्षेञीय कार्यालयातील उपव्यवस्थापक विकास हुकुमंदच निकाळजे (४०), रा. गुरुसहाणी नगर, एन-४ सिडको यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादी हे एटीएम चॅनल मॅनेजर देखील आहेत. १ डिसेंबर रोजी दुपारी एटीएम मध्ये कॅश भरणाऱ्या सीएमएस या एजन्सीच्या प्रतिनिधीचा फिर्यादीला फोन आला. त्याने विवेकानंद महाविद्यालाच्या गेटच्या बाजुला असलेल्या एटीमचा दरवाजा जळालेला असून एटीएम मधील कॅश चोरीला गेल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच फिर्यादीसह त्यांचे सहकारी संबंधी एटीएम वर गेले असता एटीएमच्या बाहेर आणि आतील कॅमेऱ्यांवर डार्क काळा स्प्रे मारलेला दिसला. तसेच एटीएमची डाव्या बाजूचा पञा गॅस कटरने कापून त्यातील कॅसेट आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ईएसक्यू ही मॉनिटरींग सॉफ्टवेअर ओपन करुन माहिती तपासली असता पहाटे ३.२३ वाजेच्या सुमारसा एटीएमचा संपर्क खंडीत झाला व एटीएम मधून ८ लाख ८९ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक सुनिल माने करीत आहेत.