Buldana constituency counting: जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या जळगाव जामोद मतदार संघाचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत आल्याचे दिसत आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे हे विजयाच्या उंबरठ्यावर असून, त्यांनी १४ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
बुलढाणा: जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या जळगाव जामोद मतदार संघाचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत आल्याचे दिसत आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संजय कुटे हे विजयाच्या उंबरठ्यावर असून, त्यांनी १४ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
जळगाव जामोद मतदारसंघात महायुती विरोधात महाविकास आघाडी असा प्रमुख सामना आहे. मात्र, अपक्षांच्या वाढत्या मताधिक्यांचा फटका महाविकास आघाडीला बसला! असे सध्या तरी दिसून येते. महाविकास आघाडी करून काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांचे आव्हान कुटे यांच्यासमोर आहे. मात्र, १४ हजारांची विक्रमी लीड पाहून कुटे समर्थकांनी शहरात विजय रॅलीला सुरुवात केली आहे.