Buldhana vote counting: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, चिखली विधानसभेची आकडेवारी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार तथा महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले २९२५ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
बुलढाणा: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, चिखली विधानसभेची आकडेवारी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान आमदार तथा महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले २९२५ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष दिसून आला आहे. चिखली मतदारसंघाची पहिल्या फेरीची मोजणी उशिरा प्राप्त झाली. यामध्ये महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले २ हजार ९ २५ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना आतापर्यंत ३ हजार ९९१ मते मिळाली आहे.