Accident on Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार, दोन गंभीर

Accident on Samriddhi Highway

Accident on Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर वाहनाचे पंचर काढत असताना मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्ल्याची घटना मलकापूर पांगरा परिसरात रविवारी घडली. या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

Accident on Samriddhi Highway

मलकापूर पांगरा : समृद्धी महामार्गावर वाहनाचे पंचर काढत असताना मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्ल्याची घटना मलकापूर पांगरा परिसरात रविवारी घडली. या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

चँनेज क्र. 260.600 मुबंई कॉरिडोर जवळ MH 28 BB 6565 हे चंद्रपूर कडुन जालना कडे जात असताना गाडीचे टायर पंचर झाल्याने सदर गाडी इमर्जन्सी लेन तसेच लेन क्रमांक 03 वर अर्धवट उभी करून गाडीचे पंचर काढत असताना काळजी न घेतल्याने मागून येणारा ट्रक वाहन क्रमांक PB 11 BR 1792 चे चालकाने वाहनास मागून धडक दिली. समोरील वाहन ( क्रमांक MH 28 BB 6565) वाहनातील वाहन चालक समाधान अस्वले वय 35 वर्षे राहणार आगेफळ यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यू झाला. हे अपघातात यादव साहेबराव टेकाळे (वय 32) राहणार मलकापूर पांग्रा गंभीर जखमी झाले. स्वतः चालक प्रकाश सुखदेव हिप्परकर ( वय 35, रा. जुरारपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर) सुद्धा गंभीर जखमी झाल्याने दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे भरती करण्यात आले असून अपघात ग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू आहे. क्यू आर व्ही टीम चे प्रमुख कुटे व इतर कर्मचारी तसेच महामार्ग पोलीसचे पीएसआय शैलेश पवार, ए एस आय विठ्ठल खोडे, दीपक विटकर, संदीप किरके, योगेश शेळके हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »