Dhamma School of Dhamma Bharat Mission : धम्ममय भारत मिशनचे धम्मास्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अॅण्ड रिचर्स सेंटरचे भूमी पूजन सोहळा येत्या शनिवार, 9 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खु ग्यानरक्षित थेरो यांनी गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती संभाजीनगर : धम्ममय भारत मिशनचे धम्मास्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अॅण्ड रिचर्स सेंटरचे भूमी पूजन सोहळा येत्या शनिवार, 9 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खु ग्यानरक्षित थेरो यांनी गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास भिक्खू धम्मसेवक महाथेरो, भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांची प्रमूख उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धम्ममय भारत मिशन अंतर्गत पैठण तालुक्यातील आडगाव जावळे या ठिकाणी असलेल्या संघगिरी महाविहार, मृगदायवन या जागेवर पूज्य धम्मास्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अॅण्ड रिचर्स सेंटरचे भूमी पूजन शनिवार रोजी करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी पाच ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत महापरित्राणपाठ, महासंघदान, कठिण चिवरदान आदी कार्यक्रम होणार असल्याचे भिक्खु ग्यानरक्षित थेरो यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास दर्शन शास्त्राचे अभ्यासक भिक्खु धम्मसेवक महाथेरो, ताडोबा अभयारण्य येथील भिक्खु ज्ञानज्योती महाथेरो, भिक्खु सुभद्रबोधी थेरो आदींची प्रमूख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, धम्ममय भारत मिशनचे येथे सी.बी.एस.ई इंग्लिश मिडीयम स्कूल, कॉलेज, महाविद्यालय, भिक्खु प्रशिक्षण सेंटर, चॅरीटी हॉस्पिटल, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण स्कूल (समता सैनिक दल) सेंटर, मेडिटेशन सेंटर, (विपस्सना केंद्र), भव्य दिव्य असे वाचनालय आदी या ठिकाणी राहणार असल्याचे यावेळी सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल बस्ते यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस भिक्खु ग्यानरक्षित थेरो, बी.के. अदमाने, अशोक येरेकर, लक्ष्मण गायकवाड, शेषराव जोगदंडे, शिवाजी वाघमारे, राहुल साळवे, अमरदिप गायकवाड, हनुमंत भवरे आदींची उपस्थिती होती.