ST employees protested : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व सणासाठी अग्रीम न मिळाल्यामुळे कन्नड आगारातील कर्मचाऱ्यांनी चटणी भाकर खाऊन अनोखे आंदोलन केले.
छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व सणासाठी अग्रीम न मिळाल्यामुळे कन्नड आगारातील कर्मचाऱ्यांनी चटणी भाकर खाऊन अनोखे आंदोलन केले. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन एसटी जनसंघ कष्टकरी संघटनेच्या वतीने आगारप्रमूख राठोड यांना देण्यात आले.
वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी सणाला एसटी कर्मचाऱ्यांना बोनस आणि दिवाळी सणासाठी अग्रीम न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. एसटी महामंडळाच्या कन्नड आगारातील कर्मचाऱ्यांनी दिवाळीसाठी बोनस न मिळाल्यामुळे चटणी भाकर खाऊन अनोख्या पध्दतीचे आंदोलन केले. यावेळी एसटी जनसंघ कष्टकरी संघटनेचे मराठवाडा सचिव सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष देविदस मराठे यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आगारप्रमूख राठोड यांना दिले. यावेळी गावित, सागर तुपशेंद्रे, गणेश साळुंखे, अनिल मुचक, पंडित राठोड, नंदू निकम, देवेंद्र पाटील, भगवान घुगे, मेहमूद शेख, पंडित राठोड, संजय मेहर, राजू पवार, ज्योती विधाते आदींची उपस्थिती होती.