Bursting crackers but with care: दिवाळी म्हणजे आनंदाचा सण परंतु या आनंदात प्रदूषणाचा धूर सोडणारा धमाका अनेकांसाठी जीवघेणा ठरतो. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
बुलढाणा : दिवाळी म्हणजे आनंदाचा सण परंतु या आनंदात प्रदूषणाचा धूर सोडणारा धमाका अनेकांसाठी जीवघेणा ठरतो. दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. फटाक्यांच्या धुरामुळे हवेत नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईडबे प्रदूषक मिसळतात. या विषारी हवेमुळे अनेकांना श्वसनास त्रास होतो. आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या कालावधीत योग्य काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. बुलढाणा तसे आरोग्यासाठी चांगले शहर समजले जाते. परंतु आता थंड हवेच्या या बुलढाणा शहरातही प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यात दिवाळीतील फटाक्यामुळे तर बघायलाच नको. दिवाळीच्या काळात आनंद साजरा करण्यासाठी फटाके मोठ्या प्रमाणात वाजविले जातात. सर्वसाधारणपणे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत फटाके वाजविण्यात येतात. यामुळे हवेतील घातक वायूंचे प्रमाण संध्याकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत वाढलेले असते. इमारतीच्या आवारातच रहिवासी फटाके वाजवितात. या फटाक्यांमुळे निर्माण होणारा धूर बाहेर जाण्यासही जागा नसते. त्यामुळे घरांमध्ये आणि आजूबाजूच्या वातावरणात ही विषारी हवा दीर्घकाळ राहते. या हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास होतो.
ध्वनी प्रदूषणास फटाका जबाबदार बुलढाणा हे शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून इंग्रज कालापासून प्रसिद्ध आहे,या बुलढाणा जिल्ह्यात जागतिक खाऱ्या पाण्याचे लोणार येथे सरोवर आहे, याबरोबरच सर्वांचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज शेगाव हे संस्थान सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातच येते, परंतु शहरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या फटाक्याच्या आतिषबाजीने निश्चितच बुलढाण्याच्या ध्वनी प्रदूषणात वाढ झालेली आहे. ही बाब सर्वांच्या आरोग्यासाठी घातकच आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी व पर्यावरणाचा ऱ्हास व समतोल साधण्यासाठी सर्व नागरिकांनी फटाका बंदी स्वयंप्रेरणेने केली पाहिजे.