dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वैजापूर नगर पालिकेच्या वतीने महिलांचा गौरव 

वैजापूर :  येथील नगर परिषद व महिला बाल कल्याण विभाग राष्ट्रीय आजीविका अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी वैजापुरचे नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, उपाध्यक्ष शेख रियाज व मुख्याधिकारी  भागवत बिघोत मुख्याधिकारी यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

जागतिक महिला दिनानिमित्ताने शैक्षणिक, सामाजिक, पोलीस, वकील, डॉक्टर, गृहउद्योग, कचरावेचक महिला, सफाई कामगार, शासकीय सेवेतील महिला कर्मचारी, उद्योजक, महिला बचत गटानी विविध उपक्रमाच्या अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकूण ६० महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच एक पेड मां के नाम अंतर्गत अमृत 2.0 च्या उपक्रमा अंतर्गत ४४०० झाडे लाऊन त्यांचे संगोपन करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरध्यक्षा शिल्पा परदेशी, नगरसेविका संगीता राजुसिंग राजपूत, बक्ष शेख सुमैय्या, मोनाली खैरे, पूजा त्रिभुवन, जयश्री चौधरी, दीपा राजपूत, लता वाणी, सुरेखा घाटे, ज्योती जोशी, सुवर्णा ठोंबरे, जयश्री राजपूत, कविता शिंदे, मनिष गणवीर, प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत, समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन, नागेश बापट आदींची उपस्थिती होती. यावेळी मौलाना आझाद विद्यालय व सेंट मोनिका इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top