Three close friends died : नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवार, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
छत्रपती संभाजीनगर : नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवार, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ही घटना कन्नड तालुक्यातील शेलगावात घडली असून दिवाळी सणाच्या तोंडावरच तीन कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आवेज नविद पटेल, अल्ताफ राजू पटेल, अफरोज सिराज पठाण, तिघे रा.शेलगाव, ता. कन्नड असे पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तिघेही जिवलग मित्र असून बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिघेही शेलगावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या पाण्यात उतरल्यानंतर तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही बुडाले होते. हा प्रकार नदीकाठच्या काही तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नदीपात्रातून तिघांना बेशुध्दावस्थेत बाहेर काढुन उपचारासाठी कन्नड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मयत घोषीत केले. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.