Aurangabad Assembly Constituency: नेमक्या निवडणुकीत उद्धवसेनेवर  ” डॅमेज कन्ट्रोल ” करण्याची वेळ !

Aurangabad Assembly Constituency

Aurangabad Assembly Constituency : विधानसभेच्या नेमक्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ” औरंगाबाद मध्य ” विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतल्याने पक्षावर तडकाफडकी निर्णय घेवून ” डॅमेज कंन्ट्रोल ” करण्याची वेळ आली आहे.

Aurangabad Assembly Constituency

सतीश रेंगे/ छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या नेमक्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ” औरंगाबाद मध्य ” विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतल्याने पक्षावर तडकाफडकी निर्णय घेवून ” डॅमेज कंन्ट्रोल ” करण्याची वेळ आली आहे. याचाच भाग म्हणून उबाठाने मा.आ. तनवाणी यांच्याकडे असलेल्या जिल्हा प्रमुख पदाची जबादारी आता महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्याकडे दिली आहे. काल ” मध्य ” ची उमेदवारी बाळासाहेब थोरात यांना दिल्यानंतर मंगळवारी दुपारी शिवसेना पक्षश्रेष्टींकडून हा निर्णय घेण्यात आला.

शिवसेना ते भारतीय जनता पक्ष आणि पुन्हा शिवसेना आसा प्रवास केलेले माजी आ. किशनचंद तनवाणी यांच्याकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पद होते. सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून ” मध्य ” विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही देण्यात आली होती. पदाधिकारी, शिवसैनिकांच्या गाठी भेटी घेणे सुरू असतांना अचानक सोमवारी मा.आ. तनवाणी यांनी पत्रकार परिषद घेवून आपण निवडणुकीतून माघार घेत असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी परत करणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेने शिवसेनेत खळबळ उडाली तर राजकीय वर्तुळातून अश्चर्य व्यक्त करण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असतांना उमेदवार पळाल्याने शिवसेना नेते आंबादास दानवे यांनी सोमवारी तडकाफडकी पत्रकार परिषद घेवून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. पक्षप्रमुखांनी मा.आ. तनवाणी यांना पक्ष कार्यातून मुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. तर आज पक्षश्रेष्टींनी शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांच्याकडे मा.आ. तनवाणीचे जिल्हा प्रमुख पद देवून नेमक्या निवडणुकीत पक्षातील ” डॅमेज कन्ट्रोल ” करण्याचा प्रयत्न केला.

त्रिवेदींमुळे राठोड तर तनवाणीमुळे वैद्यंना संधी !

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तत्कालीन ग्रामीण जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे दीड वर्षापूर्वी उबाठाचे जिल्हा प्रमुख पद राजेंद्र राठोड यांना देण्यात आले होते. आता मा.आ. तनवाणी यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचे जिल्हा प्रमुखपद भूषविण्याची संधी राजू वैद्य यांना प्राप्त झाली आहे. दुसरीकडे सुरूवातीपासून ” मध्य ” विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या बाळासाहेब थोरात यांना डावलून तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु तनवाणी यांच्या माघारीमुळे आता त्याच उमेदवारीची माळ थोरात यांच्या गळ्यात पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »