dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एका वर्षात रोखले 670 बालविवाह ; जालना येथील ‘कार्ड’ संस्थेची कौतुकास्पद कामगिरी 

जालना :  समाजातील बालविवाहाचे प्रमाण अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. विशेष करून आदिवासी, ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक दिसून येते. दरम्यान, भारत सरकारच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून जालना येथील सेंटर फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड या संस्थेने व्यापक जनजागृती करीत मागील वर्षभरात तब्बल 670 बालविवाह थांबवण्यात यश मिळवले आहे.

जालना :  समाजातील बालविवाहाचे प्रमाण अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. विशेष करून आदिवासी, ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक दिसून येते. दरम्यान, भारत सरकारच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून जालना येथील सेंटर फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड या संस्थेने व्यापक जनजागृती करीत मागील वर्षभरात तब्बल 670 बालविवाह थांबवण्यात यश मिळवले आहे. सध्या

नंदुरबार जिल्ह्यात  हे अभियान याबविण्यात असून एका वर्षात जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प संस्थेकडून करण्यात आला आहे. 

‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त  जालना येथे झालेल्या कार्यक्रमात कार्ड संस्थेने केलेल्या या कामगिरीची माहिती देण्यात आली. या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक देखील करण्यात आले असून संस्थेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या अभियानात कार्ड संस्थेने शाळांमध्ये जनजागृती, प्रतिज्ञा समारंभ, ग्रामस्तरावर संवाद मोहीमा अशा उपक्रमांची मालिका सुरू केली आहे. विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या धार्मिक नेते, मंदिर समित्या, बँड पार्टी, केटरर्स, टेंट हाऊस यांनाही बालविवाहात सहभाग आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची स्पष्ट माहिती देण्यात आली.

कार्ड संस्था ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन’ या देशभरातील २५० पेक्षा अधिक संस्थांच्या नेटवर्कची भागीदार आहे. या नेटवर्कने गेल्या वर्षभरात देशात एक लाखापेक्षा जास्त बालविवाह रोखल्याचा दावा केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही कार्डने वर्षभरात तब्बल ६७० बालविवाह थांबवले, अशी माहिती संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, समन्वयक नटवर वसावे, आरती अहिरे, संजू सोनवणे यांनी दिली.

अन्यायकारक प्रथा बंद व्हावी

  बालविवाह रोखणे आणि त्याबाबत जनजागृती करणे हा अभूतपूर्व समन्वय भारताच्या बालविवाह निर्मूलनाच्या दिशेने क्रांतिकारक ठरेल. मुलींवर अन्याय करणारी ही प्रथा आता संपुष्टात यायलाच हवी. सरकारच्या या अभियानाच्या माध्यमातून 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाद्वारे बालविवाह पूर्णपणे बंद करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहे. 

» पुष्कराज तायडे  सचिव, कार्ड संस्था ,जालना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top