Chhatrapati Sambhajinagar news : कोट्यवधीची बिले काढली; जिल्ह्यातील नळांना मात्र ठणठणाट !

Chhatrapati Sambhajinagar news

Chhatrapati Sambhajinagar news : केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या ” हर घर नल ” उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ” जलजीवन मिशन ” योजनेवर सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांचा खर्च केला आहे. तब्बल ६७७.०८ कोटी रूपयाच्या निधीतून जिल्ह्यातील १ हजार १६४ योजनाद्वारे १ हजार २४४ गावांमध्ये जलवाहिनी प्रस्तावित आहे. वितरण आणि नळ जोडणीचे कोट्यवधी रूपयांची बिले कंत्राटदारांना अदा केली असतांना अद्याप गावातील नळांना ठणठणाट आहे.

Chhatrapati Sambhajinagar news

छत्रपती संभाजीनगर :  केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या ” हर घर नल ” उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ” जलजीवन मिशन ” योजनेवर सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोट्यावधी रूपयांचा खर्च केला आहे. तब्बल ६७७.०८ कोटी रूपयाच्या निधीतून जिल्ह्यातील १ हजार १६४ योजनाद्वारे १ हजार २४४ गावांमध्ये जलवाहिनी प्रस्तावित आहे. वितरण आणि नळ जोडणीचे कोट्यवधी रूपयांची बिले कंत्राटदारांना अदा केली असतांना अद्याप गावातील नळांना ठणठणाट आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासन लाखो रूपये खर्चून या गावांना टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. या योजनेची सध्या चौकशी सुरू असून पंधरा दिवसात अहवाल येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

मागील दोन वर्षापासून राज्यात केंद्र आणि राज्य सरकार जनजीवन मिशन योजनेचा गाजावजा करीत आहे. ज्या गावात पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत नाहीत अशा
गावांमध्ये जलकुंभ आणि शाश्वत जलस्त्रोत शोधून ही योजना पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या उलट राज्यभर ज्या गावात सदृढ पाणी पुरवठा योजना आहे त्या ठिकाणीही या योजनेच्या नावाखाली खर्च करून कोट्यवधी रूपांची बिले उचलली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. त्यामुळे ही योजना सरसगट राबवणे आवश्यक होते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्गम भागातील गावांना बारा महिने पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे
चित्र आहे. फुलंब्री, सोयगांव, खुल्ताबाद अशा तालुक्यातील डोंगराळ परिसरातील गावामध्ये सार्वजनिक पाणी पुरवठ्याची बोंब आहे.

जलजीवन मिशन योजने अंतर्गत किमान या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना सक्षमपणे राबविणे आवश्यक होते. मात्र तुर्तास याजनेत समाविष्ठ असलेल्या वितरण व्यवस्था आणि गवांतर्गतच्या जळजोडणीची कामे पूर्ण झाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभगाकडून या कामांची कंत्राटे देवून त्यांची बिलेही अदा करण्यात आली. दुसरीकडे मात्र मुख्य जलस्त्रोतापासून जलवाहिनीची जोडणीच झाली नसल्याने गावांना पाण्यापासूतन वंचीत रहावे लागत आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर आता नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे…असे म्हणण्याची वेळ आली आहे.

काय आहे योजना ?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ६७७.०८ कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये १ हजार १६४ योजनाद्वारे १ हजार २४४ गावांमध्ये पाणी पुरवठा करणे प्रस्तावित आहे. ही योजना सन २०१९ पासून अस्तित्वात असून जिल्ह्यात गावनिहाय काम झाले आहे. मात्र कामे होऊनही गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दुसरीकडे नळ जोडणी आणि वितरणाची कोट्यवधी रूपयांची बिले अदा करण्याचे काम जिल्हा परिषद पाणी पुरवठा  विभगाकडून करण्यात आली आहेत. त्यामुळे या योजेनेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभगाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांचे लाटेलोटे आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे़

पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल येईल

जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे दोन टप्यात काम सुरू असून पहिल्या टप्यात वितरण आणि जळ जोडणी ही कामे झाली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून मुख्यजलस्त्रो जोडण्याचे काम करण्यात येत आहे. वितरण आणि नळजोडणीची कामे झाल्याने बिले अदा करण्यात आली आहेत. नळाला पाणी येत नसल्याचे कारण मुख्य जलस्त्रोत आहे. या संदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी अधिक्षक अभियंता महेश पाटील यांच्या अध्यक्षतखाली चौकशी सुरू आहे. पंधरा दिवसात या चौकशीचा अहवाल प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे़
– अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »