Shiv Sena (Thackeray) and BJP workers clash: ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे मागील दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज सोमवार 26 ऑगस्ट रोजी ते थांबलेले असलेल्या रामा इंटरनॅशनल या पंचतारांकित हॉटेलसमोर भाजप कार्यकर्त्याकडून सकाळी नऊ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सेनेचे कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे हे मागील दोन दिवसापासून छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज सोमवार 26 ऑगस्ट रोजी ते थांबलेले असलेल्या रामा इंटरनॅशनल या पंचतारांकित हॉटेलसमोर भाजप कार्यकर्त्याकडून सकाळी नऊ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सेनेचे कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांकडून जमा पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी 25 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर जात असताना ते छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावर येताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जबाब दो, जबाब दो असे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाड्यातील राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री आमदार आदित ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्याच्या निमित्ताने ते थांबलेले असलेल्या रमा इंटरनॅशनल या पंचतारांकित हॉटेल समोर येऊन दिशा सलीयन प्रकरणात काय झाले असे म्हणत आंदोलन केले. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ते धावून आले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचबाची होऊन वाद विकोपाला गेला. यावेळी तणाव निर्माण झाला होता. हा तनाव निवळण्यासाठी पोलिसांकडून दोन्ही कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला गेला.
तुम्ही त्यांची चाकरी करताय का, अंबादास दानवे यांचे खडे सवाल
पोलिसांकडून ही परिस्थिती निवळण्यासाठी झालेल्या चुकीबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना खडे बोल सुनावले. तुम्ही भाजपची चाकरी करताय का? असे म्हणत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. तर यावेळी उशिरा आलेल्या कार्यकर्त्यांनाही चांगलाच फैलावर घेतले.
जालना रोडवर तणाव
रामा इंटरनॅशनल ही पंचतारांकित हॉटेल अगदी जालना रोडवर असल्याने याच रोडवर दोन्ही कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यामुळे या रोडवर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची धरपकड
झालेल्या तुफान राहण्या प्रकरणी पोलिसांनी हे प्रकरण शांत करण्यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची धरपकड केली दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅन मध्ये बसवून संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले