One dies falling into Dhareshwar waterfall : धारेश्वरच्या धबधब्यात पडल्याने एकाचा मृत्यू

One dies falling into Dhareshwar waterfall

One dies falling into Dhareshwar waterfall : निसर्ग सौंदर्य लाभलेल्या धारेश्वर (धारकुंड) धबधब्यात पाय घसरून पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 22 जुलै रोजी 11 वाजता उघडकीस आली. रविवारी सायंकाळी तरुणाचा धबधब्यात पाय घसरुन तो कुंडात पडल्याची घटना घडली होती.

One dies falling into Dhareshwar waterfall
गौरव किसन नेरकर

वरठाण : निसर्ग सौंदर्य लाभलेल्या धारेश्वर (धारकुंड) धबधब्यात पाय घसरून पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 22 जुलै रोजी 11 वाजता उघडकीस आली. रविवारी सायंकाळी तरुणाचा धबधब्यात पाय घसरुन तो कुंडात पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर १७ तासांनी सोमवारी सकाळी 11 वाजता त्याचा मृतदेह धारेश्वर धबधब्याच्या कुंडाच्या कपारीत आढळून आला. गौरव किसन नेरकर (२०, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील गौरवसह १६ जणांचा एक समूह रविवारी सायंकाळी सहा वाजता सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्या जवळ मुक्कामासाठी आले होता. रात्रभर मुक्काम करून पहाटे सकाळीच दर्शन घेवून सोमवारी त्यांचा परतीचा प्रवास होणार होता. दरम्यान यातील गौरव नेरकर हा तरुण पाय धुण्यासाठी जातो असे सांगून रविवारी सायंकाळी सहा वाजता धबधब्याजवळ भ्रमंती करत असताना त्याचा अचानक तोल गेल्याने तो धबधब्यात जाऊन पडला. एक तास होऊनही तो परतला नसल्याने त्याचे मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री आठ वाजता बनोटी पोलीस दुरक्षेत्र गाठून गौरव नेरकर हरविल्याची तक्रार दिली. त्यावरून सोयगाव पोलिसांनी संशयावरून गौरवाचा धबधब्यात शोध सुरू केला. रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी ग्रामस्थ व पोलीस पाटील सुनील जाधव यांच्या मदतीने रेस्क्यू मोहीम राबविली. रात्री एक वाजेनंतर रेस्क्यू मोहिम थांबवून पुन्हा सोमवारी सकाळी सात वाजता सोयगावचे उपनिरीक्षक रजाक शेख, विकास दुबिले, संदीप सुसर, सतीश बर्डे, राजू बर्डे यांनी रामदास जाधव यांच्या मदतीने अखेर सोमवारी सकाळी अकरा वाजता मृत गौरव नेरकरचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आतापर्यंत तीन ते चार जणांचा बुडून मृत्यू

धारेश्वर धबधब्यात दरवर्षी तीन ते चार जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू होतो. तालुका प्रशासनाने अद्यापही या धोकादायक पर्यटनस्थळावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाय योजना केलेल्या नाही. या ठिकाणी संरक्षण भिंत उभारणे गरजेचे आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक रज्जाक शेख, विकास दुबिले, संदीप सुसर, राजू बर्डे आदी पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »