A woman gave birth to three babies : आजतागायत महिलेने एकावेळी दोन अपत्यांना जन्म दिल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, नुकतेच सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील रहिवासी महिलेने चक्क तीन बाळांना जन्म दिल्याची आनंददायी बाब समोर आली आहे.
सिल्लोड : आजतागायत महिलेने एकावेळी दोन अपत्यांना जन्म दिल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, नुकतेच सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील रहिवासी महिलेने चक्क तीन बाळांना जन्म दिल्याची आनंददायी बाब समोर आली आहे. यात दोन मुली व एका मुलाचा समावेश असून विशेष म्हणजे तीन बाळांसह त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ३५ वर्षीय शबान मोबीन शेख यांना प्रसूतीसाठी २१ मे रोजी सकाळी ७.३० वाजता दाखल केले होते. सकाळी १० वाजून २० मिनिटाने पहिल्या मुलाला जन्म दिला त्यानंतर एकापाठोपाठ ११.२० व ११.३० वाजता दोन मुलीना जन्म दिला. या तीन अपत्यांमध्ये प्रामुख्याने दोन मुली आणि एक मुलगा आहे. या अपत्यांची प्रकृती चांगली असून पहिल्या मुलाचे वजन २ किलो १०० ग्रॅम, दुसऱ्या मुलीचे १ किलो ६०० ग्रॅम तर तिसऱ्या मुलीचे १ किलो २०० ग्रॅम असे आहे.
शबाना यांना तीन अपत्य होतील असे सोनोग्राफीमध्येच समजताच गरोदरपणात शेख कुटुंबीयांकडून शबाना यांची विशेष काळजी घेण्यात येत होती. दिलेल्या तारखेला प्रसूती झाली. एकाचवेळी तीन अपत्यांचा जन्म झाला. ही नॉर्मल प्रसूती करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी डॉ. पाडुरंग चौधरी प्रसूती विभागातील गोदावरी डांगे तसेच नर्स सुरेखा मोरे भाग्यश्री त्रिभुवन, प्रीती मुळे, स्नेहा दळवी, ज्योती आमटे, सीमा रायकर तसेच उपजिल्हा रुग्णालयातील तसेच प्रसूती गृहातील सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की, महिलेच्या पोटात तीन बाळ आहेत. ही अतिशय जोखमीची प्रस्तृती होती. मात्र सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ही प्रसृती नॉर्मल करण्यात आम्हाला यश आले. यांचा आनंद फार मोठा आहे. तीनही बाळ व आई सुखरूप आहेत.
– डॉ. पांडुरंग चौधरी, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड.