Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगर वाचविण्यात शिंदेसेनेला यश

आता लढाई शिवसेनाविरुद्ध शिवसेना

Lok Sabha Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्याकडे राखण्यात अखेर शिंदेसेनेला यश आले आहे. कारण, आज 20 एप्रिल रोजी शिंदेसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

आता लढाई शिवसेनाविरुद्ध शिवसेना
आता लढाई शिवसेनाविरुद्ध शिवसेना

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्याकडे राखण्यात अखेर शिंदेसेनेला यश आले आहे. कारण, आज 20 एप्रिल रोजी शिंदेसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. तेव्हा आता छत्रपती संभाजीनगरात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
अखंड शिवसेनेत छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येत असे. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यातील बदलेल्या राजकारणामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांमधील हा मतदारसंघ भाजपाकडे जातो की, शिंदेसेनेकडे जातो हे निश्चित होत नव्हते. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभेत यहाँ एक फुल मोदी को भेजना है ची घोषणा केली होती. तेव्हा जवळपास भाजपाने या मतदारसंघावर दावा ठोकल्याचे निश्चित झाले होते. मात्र, दावे प्रतिदाव्यानंतर अखेर शिंदे सेनेने हा मतदारसंघ आपल्याकडेच शाबूत ठेवण्यात यश मिळवले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोण आहेत संदिपान भुमरे?

संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे आमदार आहे. ते मराठवाड्यातील शिवसेना नेते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभाग घेतला. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत.

सलग पाचवेळा आमदार

संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 1995, 1999, 2004, 2014 आणि 2019 असे सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »