Lok Sabha Elections 2024: निवडणूक रिंगणातील उमेदवारांचा ‘अवकाळी प्रचार’

'Premature campaigning' of candidates in the election arena

Lok Sabha Election 2024: सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारालाही सुरूवात झाली आहे. कमी दिवस उरले असल्याने उमेदवार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांवर ‘अपकाळ’ आणणारी अवकाळी दुदैवीच. मात्र, या घटनेचाही आपल्या प्रचारासाठी कसा फायदा करून घ्यायचा? याचे गणित राजकारण्यांना न जमले तर नवलच.

'Premature campaigning' of candidates in the election arena
‘Premature campaigning’ of candidates in the election arena

बुलढाणा: ‘कुणाचं काय अन फाटक्यात पाय..’ अशी म्हण ग्रामीण भागात रूढ आहे. याचाच प्रत्यय जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळीने आणून दिला. सद्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारालाही सुरूवात झाली आहे. कमी दिवस उरले असल्याने उमेदवार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांवर ‘अपकाळ’ आणणारी अवकाळी दुदैवीच. मात्र, या घटनेचाही आपल्या प्रचारासाठी कसा फायदा करून घ्यायचा? याचे गणित राजकारण्यांना न जमले तर नवलच.

जिल्ह्यात 9 एप्रिलला वादळवाऱ्यासह गारपिट झाली आणि सगळेच उमेदवार कधी नव्हे एव्हढया घाईघाईत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पोहचले. त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा नाही असेही नाही. मात्र निवडणूकीच्या रणधुमाळीतील त्यांचा हा ‘कळवळा’ राजकीय स्वार्थाने आच्छादलेला दिसला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आलेले फोटोसेशनही बरचं काही सांगून गेले.
9 एप्रिलला जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह गारपिट झाली. या गारपिटीमुळे खामगाव तालुक्यातील गणेशपूर, पाळा, निमखेड परिसरातील शेतक-यांच्या शेतातील ज्वारी, टोळ कांदा आदी पिकांचे नुकसान झाले. काही शेतक-यांचे शेडनेटही उध्वस्त झाले तर काही ठिकाणी पशुहानीही झाली. घटनेनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी उमेदवारांची जणू चढाओढ लागल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचण्यासाठी ‘प्रचाराचे नंतर बघू,आधी शेतकरी महत्वाचा’ असा अविर्भाव त्यांच्यात दिसत होता. मात्र ते आले, त्यांनी पाहिले आणि निघून गेले, असा नेहमीचाच शिरस्ता लोकसभा प्रचारात गुंतलेल्या या उमेदवारांनी पाळला. एरव्ही, कधीच चेहऱ्यावर न दिसणारी शेतक-यांप्रतीची काळजी यावेळी अगदी ठळकपणे दिसून आली.

‘ ए पब्लिक है, सब जानती है..!’

खामगाव तालुक्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहचल्या शेतकरी नेते व अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या पूर्णांगिनी शर्वरी तुपकर यांनी गणेशपूर येथे पोहचून नुकसानीची पाहणी केली, महायुतीचे प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर, अपक्ष उमेदवार संदीप शेळके हे सुध्दा आपल्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. सर्वानीच शेतकऱ्यांना आपआपल्या परीने धिर देत मदत मिळवून देण्याचे आश्वासनही देवून टाकले. अवकाळी होताच जिल्हा प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे व सर्व्हेक्षन सुरू करण्यात आले आहे. संसदेत जाण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना अवकाळीच्या निमित्ताने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची संधी मिळाली. त्यांनी आपआपल्या परीने शेतकऱ्यांप्रतीचा कळवळा व्यक्त केला. पण, भैय्या, ए पब्लिक है, ए सब जानती है, अंदर क्या है, बाहर क्या है, ए सब पहचानती है.. हे मात्र खरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »