Suspicious death of a young woman: बानेगावात मित्राला भेटण्यास आलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

Two cases of murder in Chhatrapati Sambhajinagar

Suspicious death of a young woman: भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथे आपल्या मित्राच्या भेटीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृतक तरुणी सिल्लोड तालुक्यातील आन्वी येथील (जि.छत्रपती संभाजीनगर) रहिवासी होती.

Suspicious death of a young woman
Suspicious death of a young woman

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथे आपल्या मित्राच्या भेटीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृतक तरुणी सिल्लोड तालुक्यातील आन्वी येथील (जि.छत्रपती संभाजीनगर) रहिवासी होती. या प्रकारणी हसनाबाद पोलिसांनी संयशित आरोपी संतोष सुरेश मोकासे (३२, रा.म्हाडा कॉलनी, भोकरदन ) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आन्वी (ता.सिल्लोड) येथील २४ वर्षीय तरूणी दोन दिवसांपूर्वी तिच्या मित्राला भेटण्यासाठी बानेगाव येथे आली होती. दोन दिवसापासून बाणेगाव येथे मासळी विक्रीचा व्यवसाय करणारा संतोष मोकासे याच्यासोबत राहत होती. तिची तब्येत खराब असल्याने संतोषाने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. दरम्यान मंगळवारी सकाळी बानेगाव येथे मृत्यू झाल्याने या घटनेची माहीती संतोष मोकासे याने राजुर पोलीस चौकी दिली.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे, पोलीस उपनिरिक्षक सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश खराटे, दीपक सोनुने, कल्याणी बोडखे यांनी पंचनामा करुन मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर सहाने यांनी तपासणी केली असून, त्या तरुणीचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकारणी हसनाबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणीच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा वगैरे आढळून आल्या नाहीत. याप्रकरणी वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील खुलासा होणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »