Rain with storm in Akola, Buldhana: अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात वादळवाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. वादळवाऱ्यामुळे काही भागात किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बुलढाणा/अकोलाः अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे नागरिकांना कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला. वादळवाऱ्यामुळे काही भागात किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मंगळवारी सायंकाळी ४ः३० वाजतापासूनच बुलढाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह ढग दाटून आले. काही वेळात पावसाचेही आगमण झाल्याने नागरिकांना जीवाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळाला. उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे काही भागात किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच काही भागातील बत्ती गुल झाल्याचेही चित्र दिसून आले.