Inflation ‘gudhi’ on buying gold: यावर्षी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सोने खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे सराफा व्यवसायीकांनी सांगितले. तर वाहनाची खरेदीही रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे.
विनोद सावळे/बुलढाणा : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तालाही महागाईचा फटका बसल्याचे चित्र आहे. यावर्षी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सोने खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे सराफा व्यवसायीकांनी सांगितले. तर वाहनाची खरेदीही रोडावल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो. संवत्सरा पाडो (संस्कृत भाषेत) या नावाने प्रसिद्ध असलेला गुढी पाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. राज्यातील लोक गुढीपाडवा त्यांच्या घरांची सजावट करून, घरी स्वादिष्ट अन्नपदार्थ, गोडधोड बनवून आणि कुटुंबातील सदस्यांसह विशेष विधी करून साजरा करतात. यावर्षी गुढीपाडवा म्हणजेच, मराठी नववर्ष ९ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याची खरेदी, वाहन खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला मोठी मागणी असते. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या लगनसराईचा काळ देखील सुरु आहे. मात्र लग्नसराईच्या निमित्ताने सोनं खरेदी करणाऱ्यांना हा चढा दर सध्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या आधी सोनं प्रतितोळा दर 71 हजारांच्या पुढे आहे, तर चांदी 82 हजारांने विकली जात आहे. परिणामी सोनं खरेदी करायचे की नाही? अशा प्रश्न खरेदीदारां समोर निर्माण झाला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
राज्यातील सोन्यांचे दर
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 65,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,010 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 70,920 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 65,010 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 70,920 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65,010 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 70,920 रुपये आहे. परिणामी लग्नसराईच्या तोंडावर दरवाढीची नागरिकांना झळ बसणार आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे दर वाढल्याने नागरिकांनी सोने खरेदी करताना हात अखडता घेतला आहे. नागरिकांकडून दहा ग्रॅम सोन्याऐवजी फक्त दोन ग्रॅम सोने खरेदी करणे पसंत केले आहे. गुढी पाडव्याच्या मुहर्तावर दरवर्षी 100 टक्के ग्राहक सोने खरेदी करतात. मात्र, यावर्षी 25 टक्केच ग्राहक सोने खरेदीला पसंती देत आहे. लग्नसराई असल्याने तेच ग्राहक सोने खरेदीला बाजारात येत आहे. त्यामध्ये सुध्दा ते मणी, मंगळसूत्र व डोरले यांचीच खरेदी करीत आहेत.
–गजानन वर्मा, सराफा व्यावसायिक, बुलढाणा.