dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Abuse of young woman:नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Abuse of young woman: शहरातील एका भागात राहणारी तरुणी आणि तिच्या मित्राला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी  बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये पिंपरी चिंचवड येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Abuse of young woman
Abuse of young woman

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका भागात राहणारी तरुणी आणि तिच्या मित्राला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये पिंपरी चिंचवड येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये नमुद आहे की, फिर्यादी तरुणी आणि तिच्या मित्राला पिंपरी चिंचवड येथील शिंदे वस्तीमध्ये राहणारा आरोपी सचिन येडे पाटील उर्फ सचिन भाऊ याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या मित्राला नोकरी लावून देतो असे म्हणून फिर्यादी आणि तिच्या मित्रांशी ओळख केली. ओळख झाल्यावर त्या दोघांच्या वागणे आणि बोलण्यावरुन ते पळून आळ्याचे आरोपीच्या लक्षात आल्यावर त्याने फिर्यादी आणितिचा मित्र यास जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या घरी याबाबत माहितीही देईल अशी धमकी देत फिर्यादी तरुणीसोबतच वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

छुप्या कॅमेऱ्यात करत होता चित्रीकरण

आरोपी सचिन येडे उर्फ सचिन भाऊ हा जेव्हा जेव्हा फिर्यादी तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवत होते तेव्हा तेव्हा तो छुप्या कॅमेऱ्याने ते चित्रीकरण करत असे. चित्रीकरण केलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्या तरुणीस देऊन तिला ब्लॅकमेल करुन पुन्हा पुन्हा शारिरीक संबंध ठेवत असल्याचेही तक्रारीत नमुद आहे. अशा तक्रारीवरुन बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सचिन येडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आहे. तर हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top