dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बोरगाव वसू फाट्याजवळ टिप्पर व एसटी बसचा भीषण अपघात; टिप्पर चालक ठार

चिखली : भरधाव वेगाने चिखलीकडे येत असलेला टिप्पर व प्रवाशांना घेऊन खामगावकडे निघालेल्या एसटी बसमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपधातात टिप्पर चालकाचा टिप्परच्या कॅबीनमध्ये अडकून करूण अंत झाला तर बस चालकाचे दोन्ही पाय निकामी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेदरम्यान चिखली ते खामगाव मार्गावरील बोरगाव वसू  फाट्यावर घडली. 

   छत्रपती संभाजीनगर येथून अकोलाकडे निघालेल्या बसला बोरगाव वसू फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या टिप्पर क्रमांक एमएच २८ एबी ८२२८ ने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टिप्परच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. टिप्परची केबिन मोठ्या प्रमाणात दबल्याने टिप्पर चालक सचिन वाघ रा. संभाजी नगर चिखली याचा जागीच मृत्यू झाला. तर बसचालक बाळू खेडकर छत्रपती संभाजी नगर बस आगार यांचे  दोन्ही पाय निकामी झाले. या अपघातात बसमधील प्रवाशीही जख्रमी झाले असून त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातग्रस्त टिप्पर हा हातनी येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तसेच आपत्कालीन यंत्रणांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना पुढील उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

काहीवेळ वाहतूक खोळंबली

अपघात घडल्यानंतर चिखली – खामगाव मार्गावरून अपघातग्रस्त वाहनांमुळे काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित यंत्रणांनी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर काही वेळात वाहतूक सुरळीत झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top