मुंबई : बीएलओ/एसआयआर रद्द करा, शिक्षकांना टीईटी सक्ती नको, तात्काळ एफआयआर मागे घ्या, या मागण्यांसाठी मुंबईतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे 9 जुलै रोजी आंदोलन केले. दरम्यान, जिल्हास्तरावरही शाळा बंद आंदोलन करून राज्यभर शिक्षकांनी एल्गार पुकारला. आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात शिक्षकांच्या विविध संघटनांसह शिक्षक भारती संघटनेचा सक्रीय पाठिंबा दिसून आला.

शिक्षकांना टीईटी सक्ती नको | आंदोलनात शिक्षक भारतीचा सक्रीय पाठिंबा
मुंबई : बीएलओ/एसआयआर रद्द करा, शिक्षकांना टीईटी सक्ती नको, तात्काळ एफआयआर मागे घ्या, या मागण्यांसाठी मुंबईतील सर्व संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे 9 जुलै रोजी आंदोलन केले. दरम्यान, जिल्हास्तरावरही शाळा बंद आंदोलन करून राज्यभर शिक्षकांनी एल्गार पुकारला. आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनात शिक्षकांच्या विविध संघटनांसह शिक्षक भारती संघटनेचा सक्रीय पाठिंबा दिसून आला.
शिक्षण विभागाने पगार कपातीचे पत्र काढूनही हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक आंदोलनात सहभागी झाले होते. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बीएलओ/एसआयआर ड्युटीच्या प्रश्नांबाबत महानगरपालिका आयुक्त, शिक्षण उपायुक्त आणि महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संयुक्त मीटिंग घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले. यापुढे मुंबईतील एकाही शिक्षकांवर ड्युटी नाकारली म्हणून एफआयआर होणार नाही तसेच ज्यांच्यावर एफआयआर झाले आहेत ते तात्काळ मागे घेण्याबाबत आदेश देण्यात येईल, असे आश्वासन दिले. टीईटी सक्तीतून शिक्षकांना दिलासा देण्याबाबत शासन सकारात्मक असून कार्यरत शिक्षकांसाठी वेगळी परीक्षा घेण्याच्या पर्यायाचा विचार करत आहोत, असे शिक्षण मंत्र्यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे, उपाध्यक्ष नंदा कांबळे, केशव जाधव, राजेश सुर्वे, देवीदास पंडांगळे यांच्यासह विविध संघटनांचो पदाधिकारी उपस्थित होते.
तर पालक रस्त्यावर उतरतील : सुभाष मोरे
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक कोटी नुकसान भरपाई द्यावी, शाळांच्या वेळा पूर्वीप्रमाणेच पूर्ण वेळ कराव्यात, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ/एसआयआर ड्युटी लावली अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी केली. शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास शाळा वाचवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवण्यासाठी, अनुदानित शिक्षणाची व्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराला विरोध करण्यासाठी पुढील आंदोलनात सर्व पालकांना रस्त्यावर उतरवणार असा इशराही सुभाष मोरे यांनी यावेळी दिला.