dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विहिरीत पडलेला मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाची दिरंगाई : शहर पोस्टेसमोर नातेवाई आणि गावकऱ्यांनी केले रास्ता रोको

खामगाव :  येथील खामगाव-अकोला मार्गावरील एका खाजगी बाजार समितीचे निर्माण कार्य सुरू आहे. याठिकाणी विहिरीच्या खोदकामासाठी आलेला 32 वर्षीय कामगाराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 16 जून रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. मात्र दुपारपर्यंत विहिरीतून मृतदेह शोधून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून कुठलेही उपाय होत नसल्याने संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी थेट शहर पोस्टेसमोर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध केला.

तालुक्यातील अटाळी येथील भगवान महादेव दांदळे हा युवक मजुरीसाठी खामगाव-अकोला मार्गावरील एका खाजगी बाजार समितीच्या आवारात विहिरीवर कामासाठी गेला होता. परंतु तेथे त्याचा पाय घसरून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे कळताच इतर मजुरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मात्र सकाळी 10 वाजता झालेली घटना दुपारी 4 वाजूनही प्रशासनाने सदर मृतकाचा मृतदेह शोधण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. तसेच संबंधित ठेकेदारही त्याठिकाणी न आल्याने संतप्त झालेल्या मृतक भगवान दांदळे यांच्या नातेवाईकांनी आणि अटाळी येथील गावकऱ्यांनी प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात रोष व्यक्त करत थेट शहर पोलीस स्टेशन गाठत पोस्टेसमोरील खामगाव-नांदुरा या मार्गावर रास्तारोको करून ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी नागपूर-भुसावळ ही बस रोखून ठेवली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढून त्यांना रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. तसेच आंदोलकांना शहर पोलीस स्टेशन मध्ये नेवून त्यांची तक्रार घेतली. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top