बुलढाणा : भूसंपादन प्रकरणात शासनातर्फे मोबदला मिळाला नसल्याने एका न्यायप्रविष्ट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, प्रशासकीय यंत्रणेवर नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले. न्यायालयाच्या निकालानुसार चक्क खुर्ची जप्त करण्यासाठी पीडित शेतकऱ्यांसह वकील आज १६ जून मंगळवार रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मोताळा तालुक्यातील गोतमारा – कोऱ्हाळा शिवारात पाझर तलावाच्या निर्मितीसाठी २००९ मध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. परंतु शासनातर्फे संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने नीना तुळशीराम सपकाळ आणि इतर शेतकऱ्यांनी मलकापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. यासंदर्भात न्यायालयाने २०२३ मध्ये निकाल देत बुलढाणा जिल्हाधिकारी, लघु सिंचन अधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाला ५ लाख ५८ हजार १० रुपये अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, एका वर्षाहून अधिक काळ उलटूनही पीडित शेतकऱ्याला मोबदला मिळाला नसल्याने न्यायालयाने कडक भूमिका घेत जिल्हाधिकारी तसेच विशेष भूसंपादन अधिकारी, लघु सिंचन प्रकल्प प्रकल्पांतर्गत जलसंधारण विभाग कार्यालयातील खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मंगळवार,१६ जून रोजी जप्तीच्या कारवाईनिमित्त ॲड. विनोद बावस्कर यांच्यासह पीडित शेतकरी प्रथमतः जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. परंतु, जिल्हाधिकारी हजर नसल्याने नंतर जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आली आहे.