dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

31 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवा : जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश  

छत्रपती संभाजीनगर :  ‘एल निनो‌’च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असून राज्यात नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरेल एवढा पाणीसाठा धरणात राखीव ठेवण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर :  ‘एल निनो‌’च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असून राज्यात नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरेल एवढा पाणीसाठा धरणात राखीव ठेवण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. या आदेशानुसार मराठवाड्यातील पाणीसाठाही राखीव ठेवला जाणार आहे. जायकवाडी धरणात सद्यस्थितीत 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.   

मोसमी पाऊस लांबणीवर पडला असून पावसासाठी अनुकूल वातावरण अद्याप तयार झालेले नाही. एल निनोचा प्रभाव वाढलेला असल्याने कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. पुणे येथे झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा, मोसमी पावसाची सद्यस्थिती याबाबत बैठक घेतली. या बैठकीला कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, गोदावरी पाटबंधारेचे कार्यकारी संचालक जयवंत गवळी उपस्थित होते. 

मराठवाड्यातील धरणांचा आणि इतर जलस्रोतांचा तातडीने आढावा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठीचा राखीव साठा निश्चित करावा. लोकसंख्या विचारात घेऊन पाणीसाठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी, महापालिका, जिल्हा परिषद आणि पाणीपुरवठा यंत्रणा यांच्या समन्वयातून पाणी व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. मराठवाडा विभागात 28 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात पाण्याची आवक होईपर्यंत पाण्याचा वापर जपून करावा. तसेच बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना काढून घ्यावी लागणार कृषीपंप

मराठवाड्यातील बहुतांश भागात ऊस, मोसंबी, मिरची, केळी यांच्यासह उन्हाळी पाण्यावर एकरकमी उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड आहे. त्यामुळे त्यांना पाणी देवून ती जगवणे शेतकऱ्यांना क्रमप्राप्त आहे. मात्र आता जलसंपदा विभागाकडून पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुधना, गोदावरी, मांजरा, सिंदफाना या आणि या सारख्या उपनत्यांच्या पात्रातून उपसा करणारी कृषीपंप शेतकऱ्यांना काढून घ्यावी लागणार आहेत.  

कलव्याचे  रोटेशन होणार बंद 

मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी धरणात केवळ 28 टक्के पाणीसाठा असल्याने त्याच्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही कालव्यांचे उन्हाळी रोटेशन बंद होण्याची शक्यता आहे. या दोन्ही कालव्यांच्या पाण्यावर छत्रपती संभाजीनगर ते नांदेड दरम्यान मोठ्या प्रमाणात ऊस, केळी, मोसंबी आदी पिकांची लागवड आहे. मात्र लांबलेल्या पावसामुळे प्रशासन पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत असल्याने आता सिंचनक्षेत्रावर त्याचा परिणाम होत आहे. 

भाजीपाल्याच्या दरात वाढ 

मागील दोन महिन्यापासून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला लागवडीवर झाला आहे. कांदा, लसून यासारखी उन्हाळी लागवड झाली नाहीच, मात्र दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या भाज्यांची लागवडही कमी झाल्याचे चित्र आहे. परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजीपाल्याचे सर्वात मोठे मार्केट असलेल्या जाधववाडी मंडईत भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top