जोरहाट : आसाममधील जोरहाट येथील भारतीय वायुसेनेच्या रोरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. लँडिंगदरम्यान भारतीय वायुसेनेचे एनएन-32 मालवाहू विमान कोसळल्याने पायलटसह पाच जवानांचा मृत्यू झाला. या अपघातात को-पायलटलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे विमान उड्डाण पूर्ण करून एअरबेसवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लँडिंगच्या अंतिम टप्प्यात अचानक विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि काही क्षणांतच ते दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले. या दुर्घटनेत पायलटसह पाच जवानांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय वायुसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, हे एएन-32 विमान नियमित उड्डाणावर होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणतेही अंदाज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन वायुसेनेकडून करण्यात आले आहे.
संरक्षण क्षेत्रातही चिंतेचे वातावरण
भारतीय वायुसेनेकडे सध्या अशा 100 एनएन-32 विमानांचा ताफा आहे. 1980 पासून हे विमान वायुसेनेच्या वाहतूक क्षमतेचा कणा मानले जाते. त्यामुळे या दुर्घटनेने संरक्षण क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अपघातग्रस्त जवानांना विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भारतीय हवाई दलाच्या पाच जवानांना वीरमरण
स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह
फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार
सार्जेंट जितेंद्र शर्मा
अग्निवीर वायू खेमाराम कुमावत
अग्निवीर वायू दानिश आलम