dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

न्यायासाठी वृद्ध शेतकऱ्यांचे शेतातच उपोषण

मानोरा : तालुक्यातील पोहरादेवी येथील वृद्ध शेतकरी विमल सुखदेव चव्हाण व सुखदेव शामराव चव्हाण यांनी त्यांच्या शेतजमिनीच्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी १० जूनपासून शेतातच आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

याबाबत ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, पोहरादेवी शिवारातील गट क्रमांक ६२ मध्ये त्यांची १ हेक्टर २१ आर शेतजमीन आहे. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीमुळे त्यांनी एका व्यक्तींकडून तीन लाख रुपये उसनवार घेतले होते. त्यावेळी शेतजमीन गहाणखताद्वारे त्यांच्या नावावर करण्यात आली होती.  उसने घेतलेली रक्कम टप्प्याटप्प्याने परत केल्यानंतरही संबंधितांनी जमीन परत देण्यास अथवा खरेदीखत रद्द करण्यास नकार दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गावातील पंचांनी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असतानाही प्रश्न निकाली न निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सदर आर्थिक व्यवहार साक्षीदारांच्या उपस्थितीत झाल्याचा दावा करत शेतजमिनीची योग्य नोंद घेण्यात यावी तसेच संबंधितांवर सावकारीचा गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top