dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

इंधन दरवाढीचा भडका ; पेट्रोल ९७.७७ तर डिझेल ९०.६७ रुपयांवर

नवी दिल्ली : एकीकडे महागाईच्या झळा तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत शुक्रवारपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलमध्ये साधारण ३ रुपयांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. १५ मे पासून देशभरात पेट्रोल ३.१४ रुपये व डिझेल ३.११ रुपयांनी वाढले आहेत. म्हणजेच पेट्रोल प्रतिलिटर ९७.७७ वर पोहोचले. तर डिझेल ९०.६७ वर पोहोचले आहे.

पेट्रोल – डिझेलमध्ये ३ रुपयांहून अधिक वाढ

नवी दिल्ली : एकीकडे महागाईच्या झळा तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किंमतीत शुक्रवारपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलमध्ये साधारण ३ रुपयांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. १५ मे पासून देशभरात पेट्रोल ३.१४ रुपये व डिझेल ३.११ रुपयांनी वाढले आहेत. म्हणजेच पेट्रोल प्रतिलिटर ९७.७७ वर पोहोचले. तर डिझेल ९०.६७ वर पोहोचले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यापूर्वीच दरवाढीचे संकेत दिले होते. त्यांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांना दररोज सुमारे १,००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. जर किमती वाढवल्या नसत्या, तर कंपन्यांचा तोटा एका तिमाहीत १ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला असता. सध्या केलेली दरवाढ ही कंपन्यांच्या एकूण तोट्याच्या तुलनेत अद्यापही कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.वाहतूक खर्च वाढल्याने आगामी काळात भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीएनजी  देखील महागले

केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर वाहनधारकांना सीएनजीच्या दरवाढीचाही फटका बसला आहे. इराण संकटामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीचा नवीन दर आता ७९.०९ रुपये प्रति किलो झाला आहे.

काँग्रेसकडून पंतप्रधानांचा उल्लेख महागाई पुरुष

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू होते,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर टीका करत पंतप्रधानांचा उल्लेख महागाई पुरुष असा केला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, “इन्फ्लेशन मॅन मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेवर महागाईचा आसूड ओढला आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये प्रत्येकी ३ रुपयांची, तर सीएनजीमध्ये २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणुका संपल्या की मोदींची लूट सुरू होते, हे आता सिद्ध झाले आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top