परभणी : पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, 6 मे रोजी धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले. येत्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा न झाल्यास आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी प्रशासनास दिला आहे.

पीक विम्याबाबत सरकारकडून विमा कंपन्यासोबत संगणमत करुन जाचक अटी व नियम लागू केले जात असल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप यावेळी आ. डॉ. राहुल पाटील यांनी केला आहे. गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा वेळेत मिळावा अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. तसेच येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा न झाल्यास परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात शेतकरी बांधव सहभागी झाले होते.