dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रतीक्षा संपली…. उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. 

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आईचे नाव वेबसाईटवर अपलोड करावे लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठीची प्रक्रिया निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होईल.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक्स:

१. results.digilocker.gov.in

२. mahahsscboard.in

३. sscresult.mkcl.org

४. results.targetpublications.org

५. results.navneet.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top