dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अकोटमध्ये वाऱ्यासह गारपीट, आसेगाव बाजार येथे  घरांची पडझड

अकोट :   तळपत्यात उन्हात अचानकपणे वातावरण बदलले आणि सायंकाळी 5 च्या सुमारास अकोट शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली यामुळे आसेगाव बाजार येथील घरावर भले मोठे वृक्ष पडून घराची पडझड झाली. मात्र जीवित हानी तळल्यामुळे मानवी नुकसान टळले. मात्र घराची पडझड झाल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

संबंधित विभागाने सर्वे करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे

अकोट :   तळपत्यात उन्हात अचानकपणे वातावरण बदलले आणि सायंकाळी 5 च्या सुमारास अकोट शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली यामुळे आसेगाव बाजार येथील घरावर भले मोठे वृक्ष पडून घराची पडझड झाली. मात्र जीवित हानी तळल्यामुळे मानवी नुकसान टळले. मात्र घराची पडझड झाल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 आज संध्याकाळी अकोट सह ग्रामीण भागामध्ये  आलेल्या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह  पावसाची हजेरी लावली. यामध्ये आसेगाव येथील धांडे नामक व्यक्तीच्या घरांवर वृक्ष फोडून घर कोसळले मात्र जीवित हानी तळली. शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास सुसाट वाऱ्यांसह  पावसाने विजेच्या कडकडाटासह सुरुवात केली. यात अकोट तालुक्यातील आसेगाव मंडळ या भागात शेतकऱ्यासह घराचे नुकसान झाले यामध्ये विजेचा पुरवठा खंडित झाला होता. संबंधित विभागाने सर्वे करुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे.

 वीज पुरवठा खंडित..!

 शनिवारी सायंकाळी पाच वाजता सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे नागरिक उकाळ्याने त्रासले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top