डोणगाव : समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 295.700 नागपूर कॉरिडॉरवर एका धावत्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवार 2 मे रोजी पहाटे 5 वाजता घडली. या ट्रॅव्हल्समधून 35 प्रवासी प्रवास करीत होते. यामधील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. चालकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. या घटनेत बस जळून खाक झाली.

समृद्धी महामार्गावर मुंबईकडून पुसदकडे निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एमएच 38 एफ 3899 या बसने पाठीमागून अचानक पेट घेतला. हा प्रकार मागून येणाऱ्या वाहन चालकाने ट्रॅव्हल्स चालकाला दिली. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकाने प्रसंगवधान राखत बस थांबवून बसमधील 35 प्रवाशांना खाली उतरवले. उतरण्याच्या घाईत बबन कदम वय 48 वर्ष रा. पुसद याच्या खांद्याला मार लागल्याने ते किरकोळ जखमी झाले. प्रवासी खाली उतरतातच या लक्झरी बसने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला. काही वेळातच बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व मेहकर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महामार्गावरील वाहने सुरक्षितपणे बाजूला केली. तसेच जखमी प्रवाशाला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. ट्रॅव्हल्स चालक आकाश जमदाडे वय 32 वर्षे रा. पुसद जिल्हा यवतमाळ हा घटनास्थळावरून फरार झाला असून प्रवासी शुभम देशमुख रा. पुसद याला विचारपूस केली असता सदर ट्रॅव्हल्स पुण्यावरून पुसदकडे जात असताना अचानक ट्रॅव्हल्सने पाठीमागून पेट घेतल्याचे मागील जाणाऱ्या वाहनाने सांगितले तेव्हाच चालकाने गाडी बाजूला घेतली अशी माहिती दिली.