बुलढाणा : महाराष्ट्राच्या मतदार यादीतील दीड कोटी नावांपैकी 50 लाख नावे ही संशयास्पद असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

चिखली मतदार संघात 24 हजार नावे ही दुबार किंवा घुसखोरीची’
बुलढाणा : महाराष्ट्राच्या मतदार यादीतील दीड कोटी नावांपैकी 50 लाख नावे ही संशयास्पद असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार देशातील 22 राज्यांमध्ये ‘एसआयआर’ म्हणजेच विशेष गहन पुनरावृत्ती ही मोहिम राबवली जात असून, यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. यासंदर्भात तयारी सुरू झाली असताना त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे महाराष्ट्रभर फिरत आहेत. आज, 29 एप्रिलला ते बुलढाणा दौऱ्यावर होते. बुलढाणा जिल्हाविषयी बोलताना चिखली मतदार संघांतील 24 हजार नावे ही दुबार किंवा घुसखोरीची असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यासंदर्भात बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.


