बुलढाणा: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे बुलढाण्यात येऊन पुस्तक वाचणार होते.

बुलढाणा: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे बुलढाण्यात येऊन पुस्तक वाचणार होते. मात्र, चिखलीमध्ये त्यांना अडवण्यात आले. बुलढाण्याच्या दिशेने जाऊ न दिल्याने त्यांना चिखली शहरातील खामगाव चौफुलीवर पुस्तकाचे सामूहिक वाचन करावे लागते.
प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांच्याकडून झालेल्या शिवीगाळी नंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून, आमदारांविरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र पोलीस प्रशासन हे आंदोलन दडपत आहे, असा आरोप प्रशांत आंबी यांनी केला आहे.


