dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पोलिसांनी अडवले बांधकाम कामगारांचे साहित्य; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल बावटा संघटनेचे आंदोलन

जालना : परतूर येथे बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून देण्यात येणारे साहित्य पोलिसांनी अडवून ठेवल्याच्या निषेधार्थ सिटू संलग्न लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सोमवार, 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

जालना : परतूर येथे बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून देण्यात येणारे साहित्य पोलिसांनी अडवून ठेवल्याच्या निषेधार्थ सिटू संलग्न लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सोमवार, 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कामगारांच्या हक्काच्या साहित्याचे तात्काळ वाटप करावे आणि कामगार नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    महाराष्ट्र राज्य इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटपासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. परतूर येथील कामगारांनी मार्च महिन्यात ‘थम व्हेरिफिकेशन’ (अंगठा पडताळणी) पूर्ण केली होती. मात्र स्थानिक गोडाऊनमध्ये साहित्य उपलब्ध नसल्याने जालना येथून साहित्य आणण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कामगारांनी स्वतःच्या खर्चाने सुमारे ५,५०० रुपये देऊन वाहन भाड्याने घेऊन साहित्य परतूर येथे आणले.

दरम्यान, साहित्य परतूरला पोहोचताच काही व्यक्तींनी चुकीची माहिती देत प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहन अडवून साहित्य पोलीस ठाण्यात जमा केले. यासोबतच कामगार नेते मारोती खंदारे आणि सरिता खंदारे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आंदोलनादरम्यान निवासी जिल्हाधिकारी मनीषा दांडगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संबंधित कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नसल्याचे निदर्शनास आले.

या आंदोलनात कामगार नेते कॉ. अण्णा सावंत, सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. मधुकर मोकळे, जिल्हा सचिव ॲड. अनिल मिसाळ, शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव भगवान कोळे यांच्यासह जिल्हाभरातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top