dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सिरसो येथे अग्नितांडव; मोठा अनर्थ टळला 

मूर्तिजापूर : तालुक्यातील सिरसो येथे सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोठ्याला मोठ्या प्रमाणात आग लागली आग एवढी भयानक होती की, गोठ्यातील सर्व वस्तू भस्मसात झाल्या, तत्परतेने गोठ्यातील जनावरे मोकळे सोडल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेत इतर नुकसान झाले मात्र जीवित हानी टळली.

     आग लागलेल्या गोठ्याच्या व घराला लागून शेत असल्याने शेतातील गव्हाचे पीक काढून झाल्यावर कचरा पेटविल्याने ही आग लागल्याचे बोलल्या जाते, या आगीत सहदेव चिंचोळकर, गजानन मालधुरे व विनायक मालधुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात घराच्या परस भागात ठेवलेले साहीत्य वाळायला घातलेले कपडे त्याच बरोबर गोठ्यातील लाकडी साहित्य व शेती उपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करुनही आग आटोक्यात येत नव्हती दरम्यान मूर्तिजापूर नगरपरिषद येथील अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. आग विझवण्यासाठी थोडा विलंब लागला असता तर मोठा अनर्थ झाला असता. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी अनिल ओईंबे, तलाठी पुरुषोत्तम महल्ले घटनास्थळी दाखल झाले, यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top