चिखली : तालुक्यातील खैरव व पाटोदा येथील तीन युवक जेसीबी चे साहित्य आणण्यासाठी आपल्या कारने नाशिक जिल्हयातील सिन्नर येथे जात असताना सिन्नर एमआयडीसी परिसरात उभ्या कंटेनरवर त्यांची कार आदळली. या भीषण अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना 25 एप्रिलच्या रात्री घडली.

तालुक्यातील खैरव येथील वैभव रामदास शिंदे, चालक श्रीकिसन हनुमान सुरोशे रा. पाटोदा व संकेत प्रकाश खोसे रा. खैरव हे तिघेजण जेसीबीचे साहित्य आणण्यासाठी कारने सिन्नर येथे गेले होते. सिन्नर एमआयडीसी परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरवर त्यांची कार धडकून झालेल्या भीषण अपघातात संकेत खोसे आणि श्रीकिसन सुरोशे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव शिंदे हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा त्यांचा सुद्धा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे प्रेताचे शवविच्छेदन केल्यानंतर रविवार २६ एप्रिल रोजी दोघांवर खैरव तर एकावर पाटोदा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे खैरव तसेच पाटोदासह चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे.