वैजापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण जखमी झाला. हा अपघात रविवार, 26 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता वैजापूर येवला रस्त्यावर विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ घडला. वैजापूर येथील देसाई फोटो स्टुडिओचे मालक नितेश उर्फ वीरू पोपटलाल देसाई (४८ वर्ष) हे या अपघातात ठार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश देसाई हे त्यांच्या दुचाकीवर येवला रस्त्यावरील नगर परिषदेच्या जलतरण तलावावर पोहण्यासाठी जात होते. त्यावेळी जलतरण तलावाकडे वळण घेत असताना समोरुन येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नितेश देसाई, डॉ. प्रतिक प्रभाकर तोडकर (२५ वर्ष), रा. बोरसर, ता. वैजापूर हे दोघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नितेश देसाई यांना तपासून मयत घोषित केले. जखमी झालेल्या डॉ. प्रतिक तोडकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. या अपघाताची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मयत नितेश देसाई यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.