dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा घाट : माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अकोला : १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी केंद्र शासनाने संसदेत १३१ वी महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक मांडले होते मात्र इंडिया आघाडी व विरोधी पक्षांनी त्याला विरोध करीत हे विधेयक नामंजूर केले.दरम्यान महिला आरक्षणाच्या नावाखाली देशातील विधानसभा व लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा घाट सरकार बांधत असल्याचा हल्लाबोल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

अकोला : १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी केंद्र शासनाने संसदेत १३१ वी महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक मांडले होते मात्र इंडिया आघाडी व विरोधी पक्षांनी त्याला विरोध करीत हे विधेयक नामंजूर केले.दरम्यान महिला आरक्षणाच्या नावाखाली देशातील विधानसभा व लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा घाट सरकार बांधत असल्याचा हल्लाबोल माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.त्या अकोल्यात स्वराज्य भवन येथे शुक्रवार,२४ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर काँग्रेसचे राज्यभरातील नेते या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या विधेयकाबाबत वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवीत आहेत. त्या पृष्ठभूमीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली. ते पुढे म्हणाल्या की, बंगाल, तामिळनाडू सह पाच राज्यात निवडणुका होऊ घातल्या असताना मुळात हे विधेयक संसदेत मांडणे चुकीचे आहे.२०२३ साली महिला आरक्षण विधेयक सर्वानुमते मंजूर झाले असताना व आता पाच राज्यात आचारसंहिता सुरू असताना संबंधित विधेयक मांडण्याची परवानगी दिली कुणी? हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय विधेयक पूर्णपणे अभ्यासले तर यामध्ये नारी वंदना कुठेच नाही असे त्या म्हणाल्या.फक्त केंद्र सरकारला ५४३ जागांमध्ये वाढ करून लोकसभेच्या ८१५ केंद्रशासित प्रदेशांच्या ३५ जागा मिळून ८५०जागा करण्याचा प्रस्ताव विधेयकात होता हे त्यांनी स्पष्ट केले. आता जिथे निवडणुका आहेत तिथे भाजपा यासंदर्भात नरेटिव्ह सेट करीत असून हा रडीचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा काळे, शहराध्यक्ष कशीश खान, माजी आमदार बबनराव चौधरी, डॉ सुधीर ढोणे, प्रकाश तायडे, महेश गणगणे, इंटक नेते प्रदीप वखारिया, प्रदेश सचिव अक्षय राऊत, नगरसेवक आकाश कवडे, निलोफर खान आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top