बंगळुरु : आयपीएल २०२६ च्या २६ व्या सामन्यात सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या. संघाकडून सलामीवीर फिल साल्टने सर्वाधिक ६३ धावा केल्या. बंगळुरूसाठी फिल सॉल्टने अर्धशतक झळकावले.

बंगळुरु : आयपीएल २०२६ च्या २६ व्या सामन्यात सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित २० षटकांत ८ बाद १७५ धावा केल्या. संघाकडून सलामीवीर फिल साल्टने सर्वाधिक ६३ धावा केल्या. बंगळुरूसाठी फिल सॉल्टने अर्धशतक झळकावले. दरम्यान या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा सहा विकेट्सने पराभव केला. १७६ रन्सचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून केएल. राहुल आणि पाथूम निसांका सलामीची जोडी म्हणून मैदानात उतरले. पाथूम निसांका या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. एक रन करून तो आउट झाला. करूण नायरला या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र तो केवळ पाच रन करून बाद झाला. त्यानंतर समीर रिझवी केवळ दोन रन्स करून आउट झाला.
केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. राहुल ५७ रन्स करून आउट झाला. राहुलचा कॅच विराट कोहलीने पकडला. स्टब्स आणि कर्णधार अक्षर पटेलने दिल्लीचा डाव राहुलच्या विकेटनंतर सांभाळला. स्टब्सने ६० रन्सची नाबाद खेळी केली. अक्षर पटेल २६ रन्स करू आउट झाला. डेव्हिड मिलरने १० बॉल्समध्ये २२ रन्सची वादळी खेळी केली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. या हंगामातील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. त्याने आणि विराट कोहलीने पहिल्या गड्यासाठी ५२ धावांची भागीदारी रचली. सॉल्टव्यतिरिक्त, टीम डेव्हिडने २६ धावा, कोहलीने १९ आणि देवदत्त पडिक्कलने १८ धावा केल्या. सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर होत्या, पण त्याची बॅट शांत राहिली. कोहली १३ चेंडूंमध्ये तीन चौकार मारत १९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येसह पॅव्हेलियनमध्ये परतला.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे घरचे मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम आहे, जिथे त्यांनी पहिल्या हंगामापासून आपले घरचे सामने खेळले आहेत. आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला हा त्यांचा बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील त्यांचा १०० वा सामना होता. यासह, आरसीबी आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इथे ९९ सामने खेळले होते, ज्यात त्यांनी ४९ सामने जिंकले आणि ४६ गमावले. याशिवाय, चार सामन्यांचा निकाल लागला नाही.


