चिखली : चिखली ते मेहकर मार्गावर कोलारा फाट्याजवळ मालवाहू बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने देऊळगाव घुबे येथील दुचाकीस्वार ठार झाला.

चिखली : चिखली ते मेहकर मार्गावर कोलारा फाट्याजवळ मालवाहू बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने देऊळगाव घुबे येथील दुचाकीस्वार ठार झाला. १८ एप्रिलच्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विनोद एकनाथ चेके (वय ४०) असे मृतकाचे नाव आहे.
देऊळगाव घुबे येथील रहिवासी होता विनोद चेके हे दुचाकीने चिखली येथून मेहकरला निघाले होते. कोलारा फाट्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास एमएच-२८-बीबी-३५६१ क्रमांकाच्या मालवाहू बोलेरोने त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच-२८-बीपी-०५९२ ला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की विनोदचा जागीच मृत्यू झाला. बोलेरो पिकअपच्या मागील चाकाचा टायर फुटला. चिखली पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे देऊळगाव घुबे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फाट्याजवळ मालवाहू बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने देऊळगाव घुबे येथील दुचाकीस्वार ठार झाला.


