dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आयशर ट्रकसह लोखंडी सळई चोरीप्रकरणी दोघे जेरबंद; साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

राजूर : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे घडलेल्या आयशर ट्रक व लोखंडी सळई चोरीप्रकरणी हसनाबाद पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ८ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजूर : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे घडलेल्या आयशर ट्रक व लोखंडी सळई चोरीप्रकरणी हसनाबाद पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ८ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी हसनाबाद येथील गुरूमाऊली ट्रेडर्स दुकानासमोर उभा असलेला लोखंडी सळईने भरलेला आयशर ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी दुकानाचे मालक स्वप्नील सत्यनारायण राठी यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.

ताबेश रफिक शेख (वय २०, रा. हडको कॉलनी, घाट रोड, चाळीसगाव) व समीर रज्जाक शेख (वय ३२, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला लोखंडी सळईचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक सखाहरी तायडे यांच्यासह पोलीस पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या बजावली.

या कारवाईबद्दल सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी पोलीस पथकाचे कौतुक करत, अशाच प्रकारे संघटितपणे काम केल्यास गुन्हे उघडकीस आणण्यात अधिक यश मिळेल आणि पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top