dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मतदार यादीतून नावे वगळू नका : खा. श्रीकांत शिंदे

छत्रपती संभाजीनगर : देशात आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणादरम्यान आपल्या हक्काच्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवार, 12 एप्रिल रोजी केले. 

आढावा बैठकीत संघटनात्मक बांधणीवर भर

छत्रपती संभाजीनगर : देशात आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणादरम्यान आपल्या हक्काच्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवार, 12 एप्रिल रोजी केले. शिवसेनेच्या आढावा बैठकीनिमित्त खासदार श्रीकांत शिंदे शहरात आले असता त्यांनी कार्यकर्त्यााना संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचे आवाहन केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार, आ.रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. संजना जाधव, आ. प्रदीप जैस्वाल, संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. शिंदे यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला. विधानसभेत पक्षाला मोठे यश मिळाले, तसेच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही कमी जागा लढवून चांगले यश मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top