Kanhaiya Kumar’s lecture in Jalna : सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत गुरुवार, 9 एप्रिल रोजी देशपातळीवरील विद्यार्थी चळवळीचे नेते कन्हैयाकुमार हे विचार मांडणार आहेत.

जालना : सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत गुरुवार, 9 एप्रिल रोजी देशपातळीवरील विद्यार्थी चळवळीचे नेते कन्हैयाकुमार हे विचार मांडणार आहेत.
जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता कन्हैयाकुमार हे ‘ भारतीय लोकतंत्र के सामने की चुनौतिया’या विषयावर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते ॲड. ब्रम्हानंद चव्हाण हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, ओबीसी नेते अशोक पांगारकर, प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी आदी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच परिवर्तनवादी कार्यकर्ते, महिला व नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर
व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. शांताराम रायपुरे, सचिव सुधाकर रतनराव रत्नपारखे, कार्याध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, सचिन कांबळे, कोषाध्यक्ष डॉ. प्रियदर्शन भवरे,स्वप्नील गायकवाड व समस्त पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


