कारंजा : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गवरील नागपूर कॉरिडॉरमध्ये मंगळवार, ७ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८:१० वाजता भीषण अपघात घडला. चॅनल क्रमांक १६३ जवळ हा अपघात झाला असून ट्रक चालक जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक यूपी ६३ बीटी ३७१९ हा नाशिकहून मुजफ्फरपूरकडे जात असताना चालकाला अचानक झोपेची डुलकी लागली. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात चालक युनिट दुबे (रा. मिर्जापूर, उत्तर प्रदेश) जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच पायलट आतीश चव्हाण व डॉ. आशुतोष मुठाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला प्राथमिक उपचार देत कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील एचएसपी पोलीस दल व अग्निशमन दलाचे पथकही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
ही संपूर्ण मदतकार्य सेवा ‘श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा’चे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तत्परतेने पार पाडली.
प्राथमिक माहितीनुसार, चालकाला आलेली झोपेची डुलकी हीच अपघातास कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनचालकांनी लांब पल्ल्याच्या प्रवासात विश्रांती घेऊनच वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.