Mysterious phenomenon in Jalna : जालना शहरातील राजपूतवाडी परिसरात रविवार, 5 एप्रिल रोजी एक धक्कादायक आणि रहस्यमय प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. विद्युत खांबाजवळील जमिनीतून अचानक लाव्हासदृश पदार्थ बाहेर पडत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

जालना : शहरातील राजपूतवाडी परिसरात रविवार, 5 एप्रिल रोजी एक धक्कादायक आणि रहस्यमय प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. विद्युत खांबाजवळील जमिनीतून अचानक लाव्हासदृश पदार्थ बाहेर पडत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.
ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ महावितरणला कळवले. माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विद्युत खांबाची तपासणी सुरू केली. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, काही नागरिकांनी प्रत्यक्ष हा प्रकार पाहिल्याचा दावा करत मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरणही केले आहे. जमिनीतून बाहेर येणाऱ्या या पदार्थामुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विद्युत गळती, जमिनीतील रासायनिक प्रक्रिया किंवा इतर तांत्रिक कारणांची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू असून, लवकरच वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


