dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेगावातील ‘आरोग्य’ मेळावा नियोजनाअभावी फेल!  10-15 कोटींची उधळपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप

मुंबई : केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनातर्फे शेगाव येथे आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा’ सर्वसामान्यांच्या हिताऐवजी केवळ सरकारी निधीच्या उधळपट्टीचे केंद्र ठरल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबई : केंद्रीय आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनातर्फे शेगाव येथे आयोजित ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा’ सर्वसामान्यांच्या हिताऐवजी केवळ सरकारी निधीच्या उधळपट्टीचे केंद्र ठरल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी अवघ्या दोन दिवसांकरिता 4 कोटी 10 लाख रुपये खर्चुन उभारलेले हेलिपॅड आता उखडले जाणार असून, हा जनतेच्या पैशांचा शुद्ध चुराडा असल्याची टीका त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल करण्यात आले, मात्र, या आरोग्य मेळाव्यासाठी तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असून, या मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला न झाल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय, तसेच द्रौपदी मूर्मू यांच्या दौऱ्यासाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवरून देखील सपकाळ यांनी आरोप केले आहेत.

नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

आयुष मंत्रालय भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन तर्फे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यासाठी तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे, विशेष म्हणजे या मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला झाला नाही, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top